अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- राहुरी स्टेशन रोडवर एक चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अघतातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
स्टेशन रोडवर पेट्रोल पंपासमोर साडेचार वाजेच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. मानोरी गावातील एम.एच 01 डि.के.0904 या स्वीट डिझायर आणि सीटी 100 या मोटारसायकलचा भीषण अपघात झाला.
त्यामधे मानोरी येथील दुचाकीस्वार अजमतखा पठाण (वय 60) हे ठार झाले तर त्यांची पत्नी हलीमा अजमतखा पठाण, वय 53 या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अहमदनगर येथे खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम