अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भाजपाचे जिल्हा सरचिटणीस आणि विद्यमान दोन नगरसेवकासह एका सोसायटी उपाध्यक्षाने आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत स्थानिक भाजपाला धक्का दिला आहे.

निवडणुकीच्या रणधुमाळी अगोदरच या पक्ष प्रवेशाने भाजपाला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. पुणे येथील सृजन हॉलमध्ये भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यासह कर्जत नगरपंचायतीचे नगरसेविका मंगल किसन तोरडमल

यांचे चिरंजीव नितीन तोरडमल आणि लालासाहेब शेळके(स्वीकृत नगरसेवक) तसेच कर्जत म. प. सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष देविदास खरात यांनी पुणे येथे आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निडणुकीच्या पूर्वीच भाजपाला धक्का दिला आहे.

पंधरा दिवसापूर्वी प्रसाद ढोकरीकर यांनी आपल्या जिल्हा सरचिटणीस पदाचा राजीनामा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला होता. भाजपाने देखील तो तात्काळ मंजुर करीत ढोकरीकर यांना पुढील मार्ग मोकळा केल्याचे सूतोवाच दिले होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, युवकचे शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे, विद्यार्थी सेनेचे स्वप्नील तनपुरे, माजी सरपंच संतोष नलवडे यावेळी उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांचे कर्जत- जामखेड मतदारसंघातील विकासकामे पाहता या विकासकामाना साथ देण्यासाठी या भाजपा पदाधिकाऱ्यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची

माहिती शहराध्यक्ष सुनील शेलार यांनी दिली. या तिन्ही भाजपाचे पदाधिकारी माजी मंत्री प्रा. राम शिंदे व उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांचे कट्टर समर्थक होते. नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीत इनकमिंग सुरू झाले आहे.