ग्राहकांच्या खिशावर ताण वाढणार, मोबाइल बिल वाढणार

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : १ डिसेंबर २०१९ पासून अनेक नियमांत बदल होत असून याचा बोजा ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो. रविवारपासून कॉलसोबत इंटरनेटचा वापर महाग होऊ शकतो.

वास्तविक, रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल दरवाढीच्या तयारीत असून यात नेमकी किती वाढ होईल याबाबत कोणत्याही कंपनीने स्पष्टीकरण दिलेले नाही.

याशिवाय विमा हप्ताही महाग होऊ शकतो. ऑनलाईन व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना १ डिसेंबरपासून एनईएफटीची सुविधा सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत आठवडाभर मिळेल. जानेवारीपासून यावर शुल्कही नसेल.

विमा कंपन्या १ डिसेंबरपासून प्लॅनमध्ये बदल करत असून यामुळे हप्ता १५ टक्के महाग होऊ शकतो. याचा परिणाम १ डिसेंबरपूर्वीच्या पॉलिसीवर होणार नाही.

शिवाय बंद पॉलिसी पाच वर्षांत रिन्यू करता येईल. एटीएमवर पैसे काढले आणि कमी बॅलन्समुळे ते फेल झाले तर त्यावर चार्ज लागेल. राजधानी, शताब्दी, दुरांतो रेल्वेंमध्ये चहा, नाश्त्यासह भोजन महागेल. तिकीट काढतानाच याचे पैसे द्यावे लागतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment