नागपूर :- घरात घुसून चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृत व्यक्तीला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली
व त्याची धिंड काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना नागपुरातील पुनापूर वस्तीत रविवारी उघडकीस आली. पीडित मुलीची आई घरकामात व्यस्त होती.
त्यावेळी जवाहर नावाचा चाळीसवर्षीय व्यक्ती घरात शिरला. त्याने घरात समोरच्या खोलीत खेळत असलेल्या चार वर्षीय मुलीशी अश्लिल चाळे सुरू केले. मुलगी रडू लागल्याने हा प्रकार तिच्या आईच्या लक्षात आला.
तिने आरडाओरड केल्याने जवाहर पळायला लागला. मात्र, वस्तीतील नागरिकांनी त्याला पकडले. बेदम मारहाण करून व त्याचे कपडे काढून त्याची धिंड काढण्यात आली.
त्याला पारडी पोलिस ठाण्यात आणले गेले. पोलिसांनी जवाहर विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे