अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पिकाबाबत उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही आहे. कारण सोयाबीनचा भाव 10 ते 11 हजारांवरून प्रतिक्विंटलला 6 हजारांपर्यंत खाली आले.
त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचे लक्ष सोयाबीनच्या भावाकडे लागले आहे. पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनचे भरघोस उत्पादन घेतले. जून, जुलै मध्ये सोयाबीनचे दर 10 हजारांच्या पुढे गेले होते.
मध्यंतरीही 11 हजारांच्या पुढे गेले होते. सोयाबीनपासून खाद्य तेला बरोबरच जनावरांसाठीचे खाद्य तसेच पोल्ट्रीसाठी खाद्य बनविले जाते. खाद्य तेलालाही भाव त्या काळात वाढले होते.
तसेच सोयाबीनचे देशांतर्गत भाव वाढण्याचे कारण म्हणजे सोयाबीन परदेशात निर्यात होत होते. यामुळे चांगला भाव मिळत होता. मात्र जसजसे भाव वाढू लागले सरकारने सोयाबीन निर्यात बंद केली.
त्यामुळे सोयाबीनचे भाव गडगडल्याचे यातील जाणकार सांगतात. अस्तगाव येथे सोयाबिनचे दर 6 हजार रुपये क्विंटल इतके होते. जून मध्ये मृग नक्षत्रातील पडलेल्या पावसाने सुरुवातीला ज्यांनी पेरले होते.
त्यांच्या सोयाबीन आता निघू लागल्या आहेत.मात्र काही शेतकर्यांनी सोयाबीन अस्तगावयेथे विक्रीस आणली होती. या सोयाबीनला 6 हजार रुपये इतका भाव मिळाला.
सोयाबीनची काढणी सुरु झाल्यानंतर व आवक वाढल्यानंतर भावात चढ उतार होऊ शकते. सोयाबीनचे भाव आताच्या पेक्षा फार कमी होणार नाहीत, असे जाणकार सांगतात. मात्र शेतकरी सुरुवातीला सोयाबीन विक्रीस आणतील का? हा प्रश्न आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम