अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या राजकीय नेत्यावर जीवघेणा हल्ला !

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक व दत्तात्रय पानसरे यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात पानसरे यांच्यासह दोघे यात जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि घारगाव येथे रस्त्याच्या वादातून पानसरे व परदेशी या दोन्ही कुटुंबात वाद सुरू होते. या वादाचे रुपांतर रविवारी ( ता. 26 ) मारामारी झाले.

यात परदेशी कुटुंबाने रिवाल्वर, तलवार, कोयता, लोखंडी गज, दगड, मिरचीपूड या हत्यारांचा वापर करून आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप दत्तात्रय पानसरे यांनी फिर्यादीत केला आहे.यात त्यांच्यासोबत महेश पानसरे हे जखमी झाले आहेत.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल :- या प्रकरणी पोलिसांनी रमेश परदेशी, शिवाजी परदेशी, नारायण परदेशी, शुभम परदेशी, योगेश परदेशी, नामदेव परदेशी, विठ्ठल परदेशी, भगवान परदेशी, हरी परदेशी, जनाबाई परदेशी, वंदना परदेशी, लता परदेशी, गीता परदेशी,

साधना परदेशी, परदेशी परदेशी, श्रेया परदेशी, सर्व राहणार घारगाव ( ता.श्रीगोंदे ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान याच मारामारी दत्तात्रय पानसरे व त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना पानसरे,

महेश पानसरे, सुनील पानसरे, किसन पानसरे, राधाबाई पानसरे यांनी गजाच्या साहाय्याने आपल्यावर हल्ला करुन जखमी केल्याची फिर्याद शुभम परदेशी यांनीही दाखल केलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe