अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील संगमनेर येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पित्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका वाडीत हा प्रकार घडला. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि आई-वडिलांसोबत राहणाऱ्या संबंधित ११ वर्षीय पिडीतेची आई बाहेरगावी गेली होती. या काळातच,
२२ जुलैच्या रात्री, २८ जुलैच्या रात्री आणि यानंतर दोन आठवड्यानंतर, असे तीन वेळा पित्याने आपल्याच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
मुलगी झोपलेली असताना तिच्याशी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने बुधवारी (दि. २९) रात्री उशिरा फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम