Sex Education : इन्फर्टिलिटी मुळे पुरुषांचा आत्मविश्वास ढासळतोय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-  लग्न होऊनही मूल होत नसल्यास विविध उपाय केले जातात. त्यात महिलांनाच जबाबदार ठरवून त्यांच्यावर उपाय केले जातात, पण जर पुरुषांमध्ये इन्फर्टिलिटी असल्यास काय?

. . . « स्टीरॉइड्स आणि काही औषधांचा पुरुषांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडतो.« इन्फर्टिलिटीची चिंता असली तरी पुरुष मदत घेत नाहीत. प्रजनन क्षमतेच्या कमतरतेला नेहमी महिलांचा विषय मानले जाते आणि हे सत्य आहे की, याचे ओझे महिलांनाच उचलावे लागते.

कारण शेवटी त्याच गर्भवती होतात किंवा होत नाहीत. याचा काही फरक पडत नाही की, फर्टिलिटीची समस्या पुरुष आहे की महिला, इलाज महिलेच्या शरीराचे होतो.

याच्याशिवाय ५0 टक्के केसेसमध्ये ज्या जोडप्यांना मुले नसतात, त्यांच्यात कुठे ना कुठे पुरुष जबाबदार असतो. अमेरिकेत पुरुष इनफर्टिलिटीवर चर्चा करण्याचे टाळतात. इनफर्टिलिटी (वंध्यत्व) सर्वात सामान्य कारण व्हेरिकोसल आहे. अंडकोषाच्या नसा खूप मोठ्या होतात.

त्यामुळे टेस्टिकल गरम होतात आणि स्पर्मच्या हालचालींवर परिणाम होतो. याला सर्जरीने ठीक केले जाऊ शकते. लठ्ठपणा, स्टीरॉयड्स आणि केस उगविण्याची औषधे यांच्यामुळेही पुरुषांच्या फर्टिलिटी वर परिणाम होतो. पुरुषांच्या इनफर्टिलिटी अनेक प्रकरणे डॉक्टरांसाठी रहस्य आहेत. खाणेपिणे, दारू, वायू प्रदूषण, तणाव, कीटकनाशक अशा कारणांमुळे फर्टिलिटी वर प्रभाव पडतो.

ह्यूमन रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित शोधांनुसार आढळून आले आहे की, पाश्चिमात्य देशांमध्ये ४0 वर्षांपेक्षा कमी वय असताना स्पर्म काउंटमध्ये घसरण झाली. पूर्वी मानले जात होते की, प्रजननास योग्य न होणे किंवा मुलांना जन्म देण्यास असमर्थ ठरणे यामुळे पुरुषांवर कोणता परिणाम होत नसेल, पण आता तशी स्थिती राहिली नाही.

डी मेनी फोर्ट युनिव्हर्सिटी, इंग्लंडमध्ये डॉ. एस्मी हाना आणि त्यांच्या टीमने २0१७ मध्ये एक सर्व्हे केला. त्यात पुरुषांना विचारले की, इनफर्टिलिटीचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम झाला आहे? ९३% लोकांनी सांगितले की, त्याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे.

त्यांच्या आत्मसन्मान वर परिणाम झाला. ते मुलांशिवाय आयुष्य घालविण्याविषयी चिंताग्रस्त दिसून आले. तरीही ४0% नी कोणती मदत घेण्याचा प्रयत्न केला नाही. दुसऱ्या बाजूला फेसबुकसहित सोशल मीडियावर महिलांच्या ऑनलाइन सपोर्ट ग्रुप तयार झाले आहेत.

२५ ते ४४ वर्षांच्या वयातील १२ टक्के अमेरिकी पुरुष इनफर्टाइल आहेत, पण पुरुष इनफर्टिलिटीविषयी चर्चा करणारे ऑनलाइन किंवा इतर ग्रुप कमीच आहेत. पुरुषांचा सर्वांत पॉप्युलर फेसबुक ग्रुप-मेन्स फर्टिलिटी सपोर्ट आहे.

तरीही त्याचे एक हजारपेक्षा कमी सदस्य आहेत. एक्स रे टेक्नॉंलॉजीस्ट ३३ वर्षीय एंडी हेंसनना २0१५ मध्ये समजले की, त्यांचा स्पर्म काउंट कमी आहे.

पाच वर्षांपर्यंत अनेक प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्या पत्नीला मूल झाले नाही. ते दुसऱ्यांबरोबर आपल्या समस्येविषयी चर्चा करू इच्छित होते, पण त्यांना लोक सापडले नाहीत.

शेवटी त्यांना मेन्स फर्टिलिटी सपोर्टची माहिती मिळाली. ग्रुपचे अधिकांश सदस्य ब्रिटनचे आहेत. हेसन म्हणतात की, अमेरिकेत अधिकांश पुरुष विचार करतात की, ते तर पहाड याप्रमाणे शक्तिशाली आहे. ते मोकळेपणाने बोलण्यास संकोच करतात.