बनावट खवा व पनीरचा जीवघेणा उद्योग बंद करण्याची मागणी

Ahmednagarlive24
Published:

शहरासह जिल्ह्यात बनावट खवा आणि पनीरचा जीवघेणा उद्योग सुरु असून, यावर त्वरीत कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी हिंदू राष्ट्र सेनेचे शहर जिल्हाध्यक्ष परेश खराडे, अमोल शिंदे, दत्ता वामन, केशव मोकाटे, विनोद काशीद, दिनेश हिरगुडे, महेश आडेप, नरेश इप्पलपेल्ली, सिध्दार्थ जाधव, स्वप्निल लाहोर आदी उपस्थित होते.

दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात शहरात मोठ्या प्रमाणात बनावट खवा पकडण्यात आला. मात्र जिल्ह्यात विविध ठिकाणी बनावट खवा व पनीर मोठ्या प्रमाणात बनवून ते विक्रीस बाजारात येत आहे.

या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून, नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे. नागरिकांना एकप्रकारे विष खाऊ घातले जात आहे.

यामुळे अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe