कोपरगाव : तालुक्यातील तीनचारी येथे शिर्डी- कोपरगाव दरम्यान राज्यमार्गावर शेती महामंडळाच्या जमिनीत काटेरी झुडपात अंदाजे ५८ वर्षे वय असणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळला आहे.
शुक्रवारी (दिनांक १३) दुपारी ४ वाजेच्या सुमारास या भागात शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीला हा मृतदेह दिसला.
त्याने आसपासच्या नागरिकांना याबाबत सांगितले. ही माहिती पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी आले.
या इसमाच्या डाव्या हाताच्या नसा व गळा कापलेला होता. आजूबाजूला दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या.
हा मृतदेह काट्यातून बाहेर काढला असता या इसमाच्या डोक्याखाली लहान धारदार कटर आढळून आले.