वाळूच्या डंपरखाली चिरडून तरुण जागीच ठार.

Ahmednagarlive24
Published:

शेवगाव- पांढरीपूल राज्यमार्गावर आखतवाडे शिवारात वाळूच्या डंपरखाली चिरडून झालेल्या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला.

शेवगावहून मिरीमार्गे नगरकडे भरधाव वेगात जाणार्‍या वाळूने भरलेल्या डंपरने समोरून येणार्‍या दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्याने शरद एकनाथ सोनवणे (वय 22 रा. आखतवाडे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

मयत शरद सोनवणे हा पुणे येथून रविवारी दुपारी चार वाजता ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेण्यासाठी व घराचे बांधकाम पाहण्यासाठी दुचाकी (एमएच 12. के.व्ही 5393) वरून आखतवाडे येथे आला होता.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास वडिलांचे औषध आणण्यासाठी शेवगावकडे जात असताना शेवगावहून वाळूने भरलेल्या डंपरने त्यास जोराची धडक दिल्याने शरद हा डंपरच्या पुढील चाकाखाली आला.

डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मयत शरद हा दुचाकीसह डंपरच्या चाकाखाली अडकल्याने पोकलेनच्या साह्याने वाळूने भरलेला डंपर पलटी करून त्यास दुचाकीसह बाहेर काढण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment