अहमदनगर लाईव्ह 24 टीम / राहुरी :- बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारा गुरुवारी १२ हजार २०० गोणी लाल कांद्याची आवक झाली.
अवघ्या ३९ गोणीलाच तेरा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला, तर साडेसहा हजार गोणी कांदा अवघ्या पाचशे ते साडेसहा रुपये दराने विकला गेला.
कांद्याला सुगीचे दिवस आले असले, तरी एकरी उत्पन्न घटल्याने शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. बाजार समितीत मागील वर्षी याच कालावधीत कांदा गोणी ठेवण्यासाठी जागा नव्हती
त्यावेळी पाचशे ते सहाशे प्रतिक्विंटल दर मिळाला होता. यंदा मात्र, आवक कमालीची घटली आहे. गुरुवारी वांबोरी बाजार समितीत १२ हजार २०० गोणी कांद्याची आवक झाली.
एक नंबर कांदा सहा ते दहा हजार, दोन नंबर कांदा ३ हजार ७०० ते ५ हजार ९००, तीन नंबर कांदा पाचशे ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला.
गोल्टी कांदा चार ते ६ हजार रुपये दराने विकला गेला. ३९ गोणी कांदा १३ हजार, ५८ गोणी कांदा १२ हजार, ७७ गोणी कांद्याला ११ हजार, तर ३४ गोणीला १०५०० रुपयांचा दर मिळाला.