अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा :- तालुक्यातील देवदैठण येथे बिबट्याचे वास्तव्य असल्याचे परत एकदा समोर आले आहे. सुनील बयाजी बनकर यांच्या शेळीवर दुसऱ्यादा हल्ला करून बिबट्याने तीला फस्त केले आहे.
त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान गायकवाड वस्तीवरील सुनिल बयाजी बनकर यांच्या गोठयातील शेळीवर हल्ला करून तिला ठार केले होते.
बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता सुनिल बनकर व त्यांची पत्नी दुध काढत होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने परत दुसऱ्या शेळीवर हल्ला करून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला.पण बनकर पती – पत्नी यांच्या ओरडण्यामुळे तसेच फटाके वाजवल्याने तो पळून गेला. यात शेळी जखमी झाली आहे.
चार दिवसात बिबट्याने दोनदा बनकर यांच्या शेळ्यांना लक्ष्य केल्यामुळे परिसरात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनकर्मचारी हनुमंत रणदिवे यांनी घटनास्थळाला भेट देऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बिबट्या दिसल्याचे समजताच या गावातील शेतकरी शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. तरी वनविभागाने या बिबट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. अशी या भागातील नागरिक मागणी करत आहेत.