पोलीस असल्याचे भासवून दोन भामट्यांनी लांबविले अडीच तोळे सोने

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :-  पोलिस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील वाहन चालकाला रूमालाचा वास देऊन त्याच्या बोटातील अंगठी व गळ्यातील चैन असा अडिच तोळे सोन्याचा मुद्देमाल अज्ञात दोन भामट्यांनी चोरून पोबारा केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सोपान मुरलीधर शिरसाठ राहणार देसवंडी हे साडेदहा वाजे दरम्यान राहुरी शहरातील भागीरथी शाळे समोर त्यांच्या गाडी जवळ उभा होते. त्यावेळी त्या ठिकाणी दोन अज्ञात भामटे आले.

त्यांनी बोलबचन करून पोलिस असल्याचे भासवीले. तसेच सोपान शिरसाठ यांचा विश्वास संपादन करून त्यांना म्हणाले कि, तूमच्या गाडीची तपासणी करायची आहे.

त्यावेळी सोपान शिरसाठ हे त्यांच्या गाडीची डिकी उघडत असताना त्या भामट्याने सोपान शिरसाठ यांना रूमालाने काहीतरी वास दिला.

त्यानंतर त्या दोन्ही भामट्यांनी सोपान शिरसाठ यांची २५ हजार रूपये किंमतीची एक तोळा वजनाची सोन्याची अंगठी व ३७ हजार ५०० रूपये किंमतीची दिड तोळा वजनाची सोन्याची चैन असा एकूण अडिच तोळे वजनाचे ६२ हजार ५०० रूपये किंमतीच्या वस्तू घेऊन त्या भामट्यांनी घटना स्थळावरून पोबारा केलाय.

सोपान मुरलीधर शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत दोन अज्ञात भामट्यां विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News