अहमदनगर लाईव्ह 24 टीम /- अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा गळा दाबून खून करणाऱ्या पत्नीस जन्मठेपेची शिक्षा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी शुक्रवारी हा निकाल दिला.
कमल ऊर्फ उषा भाऊसाहेब शिंदे (३५, अंबिकानगर, राहुरी फॅक्टरी) असे शिक्षा आरोपीचे नाव आहे. तिच्या प्रियकराची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कमलचा पती भाऊसाहेब भिकाजी शिंदे सूरतला नोकरी करत होता. पाच-सहा महिन्यांनी तो घरी येत असे. पत्नीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीशी वाद घातले.
अनैतिक संबंधांत अडथळा येत असल्याने पत्नीने व तिच्या प्रियकराने योगेश चोथे या दोघांनी मिळून ५ मे २०१७ रोजी पतीचा खून केला. असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले यांनी केला.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांच्यासमोर झाली. तपासी अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.
पुराव्याअभावी प्रियकराची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कमलला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने तिला जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
आरोपी योगेश चोथे यांच्या वतीने ॲड. राहुल पवार , ॲड. शशिकांत रकटे ॲड. अनिल कवाडे यांनी काम पहिले.ॲड. विशाल होले यांनी त्यांना सहाय्य केले.