अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अकोले :- तालुक्यातील वाघापूर येथील गंभीरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने अनेक मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी शिक्षकास पोलिसांनी गजाआड केले आहे.
या गंभीर प्रकरणाबद्दल समाजात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुक्यातील वाघापूर येथील गंभीरवाडी येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी शाळा आहे.
गुरुवारी सकाळी ग्रामस्थ एकत्र आले. या शाळेतील पिचड या शिक्षकाने अनेक मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघापूर गंभीरवाडी येथे अनेक मुलींशी असभ्य वर्तन करणार्या या शिक्षकाला अनेकवेळा समज देऊन देखील त्याच्या वागण्यात बदल झाला नाही.
या शिक्षकाने पुन्हा शाळेतील मुलींशी असभ्य वर्तन केले. यासंदर्भात गुरुवारी पालकांनी एकत्र येऊन संबंधित शिक्षकाला जाब विचारला.
दरम्यान या शिक्षकास काही महिला पालकांनी चपलेने मारहाण केल्याची ध्वनिचित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली. त्यानंतर ही बातमी सर्वदूर पसरली.
अकोले तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार या भागात घडला आहे. संतप्त ग्रामस्थांनी या शाळेला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
याप्रकरणी पालकांनी दिलेल्या फिर्यादी नुसार अकोले पोलिसांनी आरोपी-दत्तू पांडुरंग पिचड (वय- 40,मूळ गाव -पिंपरकणे, ता. अकोले ,हल्ली रा-सीड फार्म,अकोले) याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.