अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले…

Tejas B Shelar
Published:

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

याबाबतचे वृत्त पसरताच माजी मंत्री कर्डिले यांनी या सर्व चर्चांचे खंडण केले आहे.

माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येते व लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जाते.

मी भाजपमध्येच असून भाजपमध्येच राहणार असल्याचे कर्डिले यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी पक्षांतरासंबंधित कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला कर्डिले यांनी बोलताना दिला आहे.

जवळच्या सहकार्याने केला प्रवेश !

माजीमंत्री शिवाजी कर्डीले यांचे निकटवर्तीय व राहुरी तालुका भाजप अध्यक्ष अमोल भनगडे व काही विश्वासू समर्थकांनी काल भाजपला रामराम करून

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील,ना.जितेंद्र आव्हाड, ना.प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

अमोल भनगडे हे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार असून जिल्हा परीषदेत यापुर्वी राष्ट्रवादीची सत्ता असल्याने

व राजकीय गणित बांधुन भनगडेसह विश्वासु समर्थकांनी राष्ट्रावादीत प्रवेश करुन आगामी जिल्हा परीषदसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारीचे आश्वासन मिळाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe