Assembly Election Results 2022: ‘वेट अँड वॉच’ संजय राऊतांची भूमिका, निवडणुकीचे निकालाबाबत केला विश्वास साध्य

Published on -

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणूक (Five State Elections 2022) निकालाची प्रतीक्षा देशाला लागली आहे. तर गोव्यात ( Goa Elections result 2022 ) भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीनेही (Ncp) या निवडणुकीला रंगत आणली आहे. निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन भाजपची (Bjp) डोकेदुखी वाढल्याचे दिसले होते.

तर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘वेट अँड वॉच ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीचे निकालाबाबत काय निर्णय होईल हे आज ५ वाजेपर्यंत समजेल असे राऊत म्हणले आहेत.

यावेळी ते म्हणाले, मतमोजणीला आत्ताच सुरूवात झाली आहे. पोस्टाद्वारे मतमोजणी होतात त्यावर कल कळत नाही. आघाडी, पिछाडी चालत राहील. सुरुवातीचे कल येत आहेत.

लहान राज्यांचे निकाल दुपारी २ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. तर उत्तर प्रदेशचे निकाल स्पष्ट व्हायला ५ वाजेपर्यंत वाट पाहावी लागेल. थोडं थांबा. अजून अनेक राऊंड मतमोजणी सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच पुढे ते म्हणाले, गोव्यात कुणाला बहुमत मिळणार नाही. गोव्यात घोडेबाजार होणार नाही. आमचं काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांच्याशी बोलणं झालं आहे. त्यांना हवी ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत.

तर उत्तर प्रदेशात योगी पुढे जाणारच होते पण समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि त्यांचे मित्रपक्ष चांगली कामगिरी करत आहे. निकाल यायला वेळ आहे. मतमोजणी पूर्ण होईल. संपूर्ण निकाल आल्यानंतर सविस्तर बोलू असे यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेनेची महाराष्ट्राबाहेर ही आमची सुरुवात आहे. आम्हाला संघर्ष, धडपड करावी लागतेय. आम्ही थांबणार नाही. येणाऱ्या काळात लोकसभा निवडणूक लढवू असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe