पुणे : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे मागच्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP MP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चांगलेच वादात सापडले होते. आता पुन्हा एकदा ते वादात सापडण्याची शक्यता आहे.
बंडातात्या कराडकर यांनी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा एकेरी यांचा उल्लेख केल्यामुळे ते वादात सापडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. खेडमध्ये बोलताना बंडातात्या कराडकर यांनी असे वक्तव्य केले आहे.

बंडातात्या कराडकर म्हणाले,भगतसिंग यांनी केलेली क्रांती अभूतपूर्व आहे. सुरुवातीला त्यांच्या मनामध्ये महात्मा गांधींची छाप होती. महात्मा गांधींच्या अहिंसावादी धोरणाची भगतसिंग यांच्या मनावर छाप होती.
आपल्याला हे स्वातंत्र्य अहिंसक मार्गाने मिळवायच आहे, असं भगतसिंग यांना वाटायचे. पण, भगतसिंगाच्या भ्रमाचा भोपळा तीन वर्षांमध्ये फुटला,” असं बंडातात्या यांनी म्हटलंय. “१९२२ ला एक हत्याकांड झालं.
त्या हत्याकांडात समर्थन देण्यासाठी म्हणून महात्मा गांधींनी नकार दिला. तेव्हा, भगतसिंग हे महात्मा गांधींवर नाराज झाले. महात्मा गांधींच्या अहिंसावाद आणि महात्मा गांधी यांचं हिंदुत्व हे दोन्ही पक्षपाती आहेत असे विधान कराडकर यांनी केले आहे.
पुढे बोलताना कराड म्हणाले, भगतसिंग यांच्या मनावर परिणाम झाला की या म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) मार्गाने जाण्याचे कारण नाही. ते त्यानंतर क्रांतिकारक बनले.
लोकमान्य टिळक यांचं एक वाक्य आहे, की म्हाताऱ्याच्या (महात्मा गांधी) पद्धतीने स्वराज्य मिळवायचं असेल ना भारत स्वातंत्र्य व्हायला एक हजार वर्षे लागतील.
१९४७ ला जे स्वातंत्र्य मिळालं ते अहिंसेने मिळालेले नाही. १९४२ ला क्रांतिकारकांची चळवळ उभी राहिली, चले जाव चळवळ! या चळवळीमध्ये गावोगावी पोलीस स्थानके जाळणे, रेल्वे रूळ उखडणे,
सरकारी कचेऱ्या जाळणं या घटना घडत गेल्या. त्याचा बोध इंग्रजांनी घेतला की, आता हा देश सोडण्याशिवाय पर्याय नाही असे वादग्रस्त विधान कराडकर यांनी केले आहे.