Sanjay Raut : “तुमच्यावर भाजपचं लक्ष; चिकनच्या रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं हेही ईडीला कळवतील”

Published on -

नवी दिल्ली : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. भाजपवर संजय राऊत यांनी ईडीवरून टीका केली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीवरून राज्यात चांगलेच राजकारण तापले आहे.

भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अगोदर मतदाराना एक आव्हान केले होते. ते म्हणाले होते की, कोल्हापूर उत्तर पोट निवडणुकीत (Kolhapur North bypoll) मतदारांना पेटीएमद्वारे एक हजार रुपये देण्यात येत आहे.

मतदारांनी हा पैसा घेऊ नये. पैसे वाटप करणाऱ्यांविरोधात आम्ही ईडीकडे तक्रार करणार आहोत. त्यामुळे मतदारांनी पैसे घेऊ नये. नाही तर उगाच अडचणीत याल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्यानंतर संजय राऊत यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले, भोंगे लावण्याचं चंद्रकांत पाटलांना कळलं. भाजप आपल्या खर्चानं करताहेत. आता तिथेही ईडी लावतील.

जशी कोल्हापूरच्या मतदारांच्या (Voters) मागे लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जपून पैसे खर्च करा. तुम्ही भाजीची जुडी जरी विकत घ्यायला गेला तरी, तुमच्यावर भाजपचं लक्ष आहे.

तुम्ही चिकनच्या (Chicken) रांगेत गेला तरी किती किलो चिकन घेतलं? किती घेतलं? आज किती घेतलं? यावर भाजपचं लक्ष आहे.

ते ईडीला कळवतील. त्यामुळे सावध राहा असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

देशात अनेक राज्यात भोंगे उतरलेले नाहीत. भाजपशासित राज्य मोठ्या प्रमाणात भोंगे आहेत. मधल्या काळात गोव्यात होतो. अनेकदा अजान ऐकत होतो. गोव्यात दहा वर्षापासून भाजपचं राज्य आहे.

उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी गेलो. उत्तर प्रदेशातील भोंगे आहे तसेच आहेत. काल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यांबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्याचं पालन होणं गरजेचं आहे असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe