अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका चार वर्षीय मादी जातीचा बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. ३०) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चंदनापुरी घाटातील वनविभागाच्या हद्दीतून चार वर्षीय बिबट्याची मादी जवळच असलेल्या सरळधाववाडीकडे महामार्ग ओलांडून येत होती.
त्याच दरम्यान भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या मादी बिबट्याला जोराची धडक दिली. त्यात ती जागीच ठार झाली.
अपघातात ठार झालेल्या बिबट्याच्या मादीला महामार्गावरून बाजूला घेण्यात आले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बिबट्या मादीला वनविभागाच्या वाहनातून निसर्ग परिचय केंद्रात नेले.
जंगलांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी भक्ष नसल्याने हे बिबटे भक्षाच्या शोधात कधी मानवी वस्त्यांमध्ये तर कधी महामार्ग ओलंडताना त्यांना आपले जीव गमवावे लागत आहे. २०१९ या वर्षांत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर सगळ्यात जास्त बिबटे ठार झाले आहे.
हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शालिनी विखे यांची माघार
हे पण वाचा : वडीलांनी पाहिलेलं मंत्रिपदाचे स्वप्न यांच्या मुलांनी पूर्ण केल !
हे पण वाचा : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच अजितदादांनी केला हा पराक्रम !
हे पण वाचा : मुलगा कॅबिनेट मंत्री झाल्यावर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख म्हणाले …
हे पण वाचा : मंत्रीपद न मिळाल्यामुळे रोहित पवार म्हणतात….