तर.. माझ्यासमोर किरीट सोमय्या आल्यास मी त्याला मारेल, टीका करताना शिवसेना नेत्याची जीभ घसरली

Published on -

औरंगाबाद : राज्याच्या राजकारणात दररोज नवीन हालचाली घडत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांना (ED) घेऊन सुरु झालेले वाद मिटताना दिसत नाहीत, तसेच यातून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.

शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद चक्रीवादळाच्या रूपात बदलत आहे. नुकतेच संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणल्यामुळे हा वाद आणखी चिघळत आहे.

त्यातच आता शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शेलक्या शब्दात किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. मात्र यावेळी खैरे यांची जीभ घरसल्याचेही पाहायला मिळाले आहे.

काय म्हणाले खैरे?

किरीट सोमय्या मला घाबरतो. एकदा विमानात मी त्याचा घात पकडला होता. मी त्याला काय किरीट म्हणतो. तो सतत हा हु हा हु करत असतो. त्यामुळे मी त्याला शक्ती कपूर म्हणतो. माझ्या समोर आला तर मी त्याला मारेन.

मी मतांची खंडणी घेतली, पैशांची नाही. माझ्यावर ईडी पडू शकत नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला आहे. तसेच आपल्यावर ईडीची पिडा होऊ शकत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe