किरीट सोमय्या एक धाडसी नेता, ते काही पळपुटं नेतृत्व नाही; प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

Content Team
Published:

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावरील आरोपांबाबत आता भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी माध्यमांसोबत प्रतिक्रिया दिली आहे.

दरेकर यांना मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिलासा देत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. त्यानंतर दरेकर माध्यमांशी बोलताना त्यांना सोमय्या यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.

त्यावेळी दरेकर म्हणाले की, ‘किरीट सोमय्या हा एक धाडसी नेता आहे. आपण बघाल तर तो कशाचीही पर्वा न करता, राज्यात जे जे घोटाळे झाले ते महाराष्ट्रासमोर आणले आहेत.

इतकंच नाही तर भ्रष्टाचाऱ्यांना शिक्षा होण्यापर्यंत त्यांनी पुरावेसुद्धा दिलेले आहेत. ज्यावेळेला आपण इतरांवर आरोप करतो तेव्हा आपल्याला पळायचं काही कारण नाही.

किरीट सोमय्या कुठेही पळून जाणार नाहीत. किरीट सोमय्या पोलीस चौकशीला निश्चितपणे सामोरे जातील. हा मला पूर्ण विश्वास आहे. ते काही पळपुटं नेतृत्व नाही’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

दरम्यान, आयएनएस विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणात किरीट सोमय्या गायब आहेत. मात्र, आज जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर ते पहिल्यांदाच सोशल मीडियावर समोर आले.

या घोटाळा प्रकरणात आपण उच्च न्यायालयात जाणार असून तिथे आपली बाजू मांडणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. इतकंच नाही तर नुसते हवेतील आरोप करण्यात आले आहेत. या संपूर्ण गोष्टी कोर्टासमोर मांडणार असल्याचं सांगतानाच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe