“सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही, मरायला आणि मारायला तयार आहे”

Ahmednagarlive24 office
Published:

नागपूर : मातोश्रीबाहेर (Matoshree) हनुमान चालीसा पठण करण्याचे रवी राणा (Ravi Rana) आणि नवनीत राणा (Navneet Rana) यांनी ठरवल्यानंतर शिवसैनिक काल रात्रीपासून चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे (Shivsena) फायरब्रॅन्ड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याच्या पाठीमागे असलेल्या भाजपला चांगलाच इशाराच दिला आहे. ते म्हणाले, कुणाच्या तरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन तर शिवसैनिक (Shiv Sainik) काय स्वस्थ बसतील का..

कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाल सांगू नका… सरकारनं काय केलं पाहिजे… मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे.. हे सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला (Maharashtra) आलेलं नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत पुढे म्हणाले, तुम्ही कोण आहात.. काय लायकी तुमची आहे? आम्हाला धमक्या देऊ नका.. हिंमत असेल ईडी, सीबीआय लावा.. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.. शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही याक्षणी.

अजून काहीही सुरुवात झालेली नाही. दोन दिवसांत झालेल्या घटना या फक्त शिवसैनिकांच्या मनातील भावना नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रोष आहे. परत सांगतो.. आय रिपीट..

राष्ट्रपती राजवट लागण्याच्या धमक्या आम्हाला द्यायची नाही..आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही.. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. असेही राऊतांनी विरोधकांना ठणकावले आहे.

बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा. सात जन्म घ्यावी लागतील भाजपला आम्हाला पुरुन उरायला… केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिथले लोकं पुरुन उरले होते.

कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याचं काम भाजपचीच लोकं करत आहेत. त्यामुळे हा सगळा प्रकार बंद करा असेही राऊतांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe