पोलिसांत तक्रार दिल्याने चाकूने भोसकून खून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदा : तालुक्यातील पिंपळगाव पिसा बेथे किशोर हस्तीमल काळे यांच्या शेताच्या बांधालगत हस्तीमल चाफा काळे , वय ७० यांनी आठ महिन्यापूर्वी काही जणांविरुद्ध पोलिसांत चोरीची केस दिली होती.

तसेच पोलिसांना सांगून आरोपीही पकडून दिले होते. या कारणावरुन काल वरील ठिकाणी ७ आरोपींनी दुचाकींवर येवून जमाव जमवून लाथाबुक्क्याने मारहाण केली.

धारदार चाकूने छातीवर , पाठीवर , हातावर वार करुन भोसकून हस्तीमल काळे यांना जागीच ठार मारले. काल १० . ३० वा . हा खून करण्यात आला.

मयताचा मुलगा किशोर हस्तीमल काळे याने बेलवंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन खून करणारे आरोपी आलेशा रमेश काळे, रमेश मोतीलाल काळे, गिल्या रमेश काळे, कलकाबाई रमेश काळे, सतेस नवकवाशा भोसले, छत्तीस नवकवाशा भोसले, हल्या पंडित भोसलेसर्व रा . मोहरवाडी , श्रीगोंदा यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment