अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका पत्नीने शरीर संबंधाची मागणी केल्यानंतर पतीने तिला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या पतीने सन्यास घेतला असल्यामुळे त्याला संभोग करायचा नव्हता. अशात पत्नीने शरीरिक संबंधासाठी विचारल्यामुळे पतीने तिला मारहाण केल्याची सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या पीडित महिलेचा 2016 साली सरखेज इथे राहणाऱ्या एका तरुणाशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर सगळीत सुरळीत चालू होतं.
पण 2018मध्ये पहिलं मूल झाल्यानंतर त्यांच्या दुरावा आला. पतीने पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचे बंद केले. त्यानंतर त्यांच्यात कायम वाद होत असायचे.
जेव्हा पत्नीने पतीकडे शरीरसंबंधाची मागणी केली, तेव्हापतीने सतंप्त होऊन तिला मारहाण केली अखेर या सर्वास कंटाळून त्यानंतर त्याने घर सोडलं
आणि काही दिवसांनी मुलांची जबाबदारी घेण्याचंही सोडून दिल्याची तक्रार पीडितेने पोलिसांत केली आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाची अहमदाबाद पोलीस स्थानकांत नोंद करण्यात आली असून पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहे.