अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ‘पैसे देत नाही’ या रागाने मुलानेच केले जन्मदात्या आईच्या देहाचे तीन तुकडे केले, जन्मदात्या आईचीचीच हत्या करणाऱ्या या नराधमाचा घाटकोपर पोलिसांनी 10 दिवसांत सुगावा लावला.
आई पैसे देत नाही याचा राग आल्याने जन्मदात्या आईलाच शुल्लक कारणावरून तिची गळा दाबून हत्या करत देहाचे तीन तुकडे करून रस्त्यावर फेकून देणाऱ्या नराधम मुलाला घाटकोपर पोलिसांनी कुर्ला येथील राहत्या घरातून अटक केली. मोहंमद सोहेल शफी शेख (33) असे अटक आरोपीचे नाव आहे .
घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 30 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 9:30 च्या सुमारास शीर आणि पाय नसलेल्या महिलेचा मृतदेह सापडला होता. या हत्येचे गूढ उकळले असून हत्या करणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो त्या महिलेचा मुलगा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मोहंमद सोहेल शफी शेख याने आईच्या नात्याला काळिमा फासली आहे. सोहेल शेख आणि त्याच्या आईचे रोज काहीना काही शुल्लक कारणावरून भांडण होत असत . सोहेल नोकरी धंदा करत नसल्याने तो बेरोजगार होता. उनाडक्या मज्जा मस्ती करण्यातच त्याचा दिवस जायचा. दिवस मजा मस्तीसाठी तो रोज आईकडे पैशांची मागणी करायचा.
आरोपी मुलगा सोहेल शेख याने हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत थर्टी फर्स्टही साजरा केला. घरात असलेले दागिने विकून त्याने मैत्रिणीला पैसे दिल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले आहे. आपल्या आईची निर्घृणपणे हत्या करून या तरूणाने मजा केल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर या प्रकरणाने खळबळ उडाली.
आईच्या मृतदेहाचे तीन तुकडे करून ते पाण्याने धुतले. त्यानंतर बाईकच्या साहाय्याने मृतदेहाचे तुकडे त्याने मुंबईतील विविध ठिकाणी फेकून दिले. ३० डिसेंबर रोजी विद्याविहार येथे एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असल्याने अनेक दिवस महिलेची ओळख पटली नव्हती. त्यानंतर आता या प्रकरणाचा उलगडा पोलिसांना झाला आहे.