राज्यसभेच्या निकालावर शरद पवारांकडून फडणवीसांचे कौतुक; म्हणाले, धक्का…

Ahmednagarlive24 office
Published:

मुंबई : राज्यसभेची निवडणूक झाली असून निकाल (Rajya Sabha Election Results 2022) लागला आहे. या मतमोजणीनंतर अखेर राज्यसभेच्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपने (BJP) महाविकास आघाडीवर मात केली आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले आहेत.

या निकालावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक करतानाच त्यांना टोलेही लगावले आहेत.

शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यसभेच्या निवडणुकीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, ही निवडणूक सोपी नव्हती. राजकारणात रिस्क घ्यावी लागते. ती रिस्क मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतली. शिवसेनेने (Shivsena) सहावी सीट लढवली.

सहाव्या सीट निवडून आणण्याच्या मतांमध्ये मोठा गॅप होता. आमच्याकडे सहाव्या मतांसाठीची संख्या कमी होती. तरीही आम्ही धाडस केलं. प्रयत्न केला. सहाव्या सीटसाठी भाजपकडे संख्या अधिक होती. तरीही आघाडी आणि भाजपकडे (Bjp) विजयासाठीची मते पुरेशी नव्हती. पण आम्हाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना आपल्याकडे वळवण्यात आले.

फडणवीसांनी वेगवेगळ्या मार्गांनी ही माणसं आपलीशी केली. त्यामुळे हा फरक पडला. एकंदर जो चमत्कार झाला आणि विविध मार्गाने माणसं आपल्या बाजूने करण्यात फडणवीसांना यश आलं हे मला मान्य केलं पाहिजे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

तसेच ते म्हणाले, या निकालाने मला धक्का बसलेला नाही. आमच्या आघाडीचा कोटा ठरलेला होता. त्यात काही फरक पडलेला नाही. उलट भाजपचं एक मत आम्हाला अधिक पडलं. भाजप समर्थित अपक्ष आमदाराने आम्हाला हे एक अतिरिक्त मत दिलं. मला सांगून हे मत देण्यात आलं, असे पवारांनी सांगितले आहे.

आमच्या कोऑर्डिनेशनमध्ये काही फरक पडला नाही. एकदोन मते इकडे तिकडे झाली. ज्यादा घेतली. पण ती दोन नंबरची होती. त्यांना ज्यादा मिळाली. पण काँग्रेस सेना, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकाही मताला धक्का बसला नाही. भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. राहिला अपक्षांचा भाग. तर त्यात गंमती झाल्या आहेत, असेही शरद पवार म्हणाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe