आकाशरावं लई भारी हं…! 5 वर्षांपूर्वी लोकाची शेती कसणारा आज बनला 16 एकराचा मालक, शेतीत केला बदल अन झाली लाखोंची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer: मित्रांनो भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकापासून शेतीमध्ये नुकसान सहन करत आहेत.

यामुळे आता देशातील अनेक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. मात्र असे असले तरी देशात असेही नवयुवक आहेत ज्यांनी आपल्या अपार कष्टाच्या जोरावर आणि योग्य नियोजनाणे शेती व्यवसायात (Farming) चांगली कामगिरी करत असून लाखों रुपयांची कमाई (Farmers Income) देखील करत आहेत.

मध्यप्रदेश मधील (Madhya Pradesh) एका शेतकऱ्याने देखील शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करत शेती फक्त तोट्याचीच असं म्हणणाऱ्यांना शेती ही फायद्याची देखील ठरू शकते हे दाखवून दिले आहे.

एकेकाळी भाड्याच्या जमिनीवर शेती सुरू करणाऱ्या मध्यप्रदेशच्या सागर येथील युवक शेतकरी आकाश चौरसिया यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला.

त्यांनी मिश्र पिकपद्धतीचा (Multilayer Farming) अवलंब करत लाखों रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे एकेकाळी भाड्याच्या जमिनीवर शेती कसणाऱ्या या अवलियाने आज 16 एकर जमीन देखील खरेदी केली आहे.

आज आकाश यांची तिली गावात 16 एकर शेती आहे. हा तरुण शेतकरी गेल्या 5 वर्षांपासून शेतात एकाच वेळी 4 प्रकारची पिके घेत आहे. यातून दरवर्षी 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न कमवीत आहेत.

बहु-शेती अंतर्गत वर्षभर पीक घेतले जाते. ही लागवड लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे आकाश नमूद करतात. आकाश यांना खरं पाहता डॉक्टर बनायचे होते मात्र आपले स्वप्न सोडून त्यांनी 10 दशांश जमीन भाड्याने घेऊन शेती कसण्यास सुरूवात केली.

बहु-शेती पद्धतीने शेती करण्याचा फायदा असा झाला की कमी जागेतही चांगले उत्पन्न मिळवण्याचा मार्ग खुला झाला. एकाच वेळी अनेक पिकांची लागवड केल्यामुळे संसाधनांचा अधिक चांगला वापर करता आला.

त्यानंतर आकाश थांबले नाहीत आणि पुढे जात राहिले. आकाश सांगतो की बहु-शेती पद्धतीसाठी थोडी काळजी आणि लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. बहुस्तरीय पद्धतीने म्हणजेच मल्टी लेअर फार्मिंग (Multi layer farming) मध्ये एकाच जमिनीवर वेगवेगळ्या उंचीची पिके घेतली जातात.

अशा प्रकारे बहु पिक पद्धत शेती केली जाते:- आकाशराव फेब्रुवारीमध्ये आल्याची लागवड जमिनीच्या आत करतात. याचं महिन्यात आल्याच्या पिकावर राजगिरा लावला जातो.

यानंतर दोन पिकांमध्ये काही अंतरावर पपईची रोपे लावली जातात. यासोबतच कुंद्रूचा वेल लावून ते बांबूच्या साहाय्याने शेताच्या मधोमध वर करतात. कुंद्रूची एक वेल पाच ते दहा वर्षे उत्पादन देते.

बांबूच्या साहाय्याने ही वेल शेतात पडवीसारखी पसरते. अशा प्रकारे आले, राजगिरा (पानांचे पीक), पपई आणि कुंद्रू यांची लागवड एकाच शेतात केली जाते.

या शेतीतून वर्षभर उत्पन्न सुरू असते. तसेच कुंद्रूचा वेल मंडपाप्रमाणे पसरल्याने त्याखाली उगवणाऱ्या पिकांचे तापमानही संतुलित राहते.

डॉक्टर होण्याचे स्वप्न होते मात्र बनले शेतकरी:- तरुण शेतकरी आकाश म्हणतो की, त्याचे स्वप्न डॉक्टर होण्याचे होते. बारावी उत्तीर्ण झाल्यावर एमबीबीएसची तयारी सुरू केली, पण काही दिवसांनी त्याचा विचार बदलला.

डॉक्टर बनून लोकांचे आरोग्य सुधारू शकणार नाही, असे त्याला वाटले, कारण सध्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांची तब्येत आणखीनच बिघडणार आहे.

त्यामुळे आरोग्य सुधारण्यावर भर दिला. आरोग्य निरोगी ठेवण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. तो शेतीतून येतो, म्हणून त्याने आपले शिक्षण सोडून शेती सुरू केली.

बारावीपर्यंतच शिक्षण घेतले. तेव्हापासून आकाश शेती करत आहेत. बुंदेलखंडमध्ये पाण्यासाठी भांडण व्हायचे. हे पाहून नवा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वी झाला.

त्यातून बहुस्तरीय शेतीची नवीन पद्धत विकसित झाली. सेंद्रिय शेती आणि बहुस्तरीय शेतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाश यांचा प्रगत शेतकरी म्हणून गौरव देखील केला आहे.

याशिवाय त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी दुबईसह देशातील अनेक भागात बहुस्तरीय शेतीचे प्रशिक्षण दिले आहे.

जमिनीचा pH तपासून पीक लावा:- चांगल्या उत्पादनासाठी जमिनीचा पीएच सामान्य असणे आवश्यक असल्याचे शेतकरी आकाश यांनी सांगितले.

जर पीएच सामान्य नसेल तर ते दुरुस्त करण्यासाठी उपाय करावे लागतील. मातीचा पीएच तपासल्यावर पीएच जास्त असल्यास गोमूत्र शेतात टाकावे लागते.

पीएच कमी असल्यास चुन्याची भुकटी किंवा रॉक फॉस्फेट टाकून जमिनीची नांगरणी करावी लागते. पीएच सामान्य झाल्यानंतर पिकाची लागवड केली जाते. जेव्हा पीएच सामान्य नसतो, तेव्हा मातीच्या आत असलेले जीवाणू आणि पोषक घटक काम करणे थांबवतात.