Monsoon Update: पाच दिवस पावसाचे! आज पासून पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, वाचा IMD चा ताजा अंदाज

Ajay Patil
Published:

Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) तसेच सामान्य जनता मान्सूनच्या पावसाची (rain) प्रतीक्षा बघत आहेत. मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाला असला तरीदेखील अजूनही अपेक्षित असा पाऊस बघायला मिळत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांच्या पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यात देखील पावसाची (Monsoon Rain) आतुरतेने वाट बघितली जात आहे.

मात्र, आता भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात मान्सून (Monsoon News) पुन्हा एकदा सक्रिय होणार असून आज पासून पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देखील हवामान खात्याकडून (IMD) देण्यात आला आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी बांधव आता पुन्हा एकदा नव्याने खरीप हंगामातील (Kharif Season) पेरणीपूर्व कामाला लागला असल्याचे चित्र आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या 90 दिवसात पुणे शहरात एकदाही पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय जिल्ह्यात देखील काहीशी अशीच परिस्थिती आहे.

ठराविक अपवाद वगळता जिल्ह्यातील अनेक भागात जून महिन्यात एकदा देखील पाऊस पडलेला नाही. पुणे जिल्ह्यात जून महिन्यात फक्त 28 मिमी पावसाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. यामुळे निश्चितच इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात या मान्सून हंगामात आतापर्यंत पावसाची अवकृपाचं बघायला मिळाली आहे.

मात्र आता परिस्थिती लक्षणीय बदलतं आहे. भारतीय हवामान खात्यानुसार आता पुणे जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचा साठी पोषक वातावरण तयार होत आहे. विभागाच्या मते, पुणे शहरातील हवेचा दाब आता कमी होऊ लागला आहे.

यामुळे शहरासमवेतचं संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण अल्हाददायक बनले असून आता गारवा निर्माण झाला आहे. गेले काही दिवस 1006 हेक्टा पास्कल असलेला हवेचा दाब आता 1002 हेक्टा पास्कलपर्यंत आला आहे. याचाच अर्थ मान्सूनच्या पावसासाठी सिस्टिम कार्यरत होत आहे. हवेचा दाब कमी झाल्याने आकाशात बाष्पयुक्त ढगांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे लवकरच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी लागणार आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुणे घाटमाथ्यावर मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच आजपासून 24 जूनपर्यंत पुणे शहरासह पुणे जिल्ह्याला भारतीय हवामान विभागाने पावसाचा ‘ यलो अलर्ट ‘ जारी केला आहे.

म्हणजेच आजपासून पुढील पाच दिवस पावसाचे राहणार आहेत. या कालावधीत पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे निश्चितच पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या असून शेतकरी बांधव आता जोमात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe