Monsoon Update: पाऊस आला मोठा…..!! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट, वाचा आजचा मान्सून अंदाज

Ajay Patil
Published:

Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची (Rain) चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बळीराजाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. काल राज्यात मान्सूनच्या (Monsoon) पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. यामुळे पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. तसेच उकाड्याने हैराण झालेल्या सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

काल राज्यातील कोकणासह विविध जिल्ह्यात मान्सूनच्या (Monsoon News) पावसाची दमदार बॅटिंग बघायला मिळाली. राजधानी मुंबई देखील काल मान्सूनचा पाऊस (Monsoon Rain) झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबई वासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी मान्सूनच्या पावसाची नोंद करण्यात आली. मात्र असे असले तरी अद्यापही मान्सूनचा पाऊस स्थिरावला नसल्याने शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करू नये असा सल्ला देखील कृषी विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) राज्यातील एकूण 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो तसेच ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी काही काळात राज्यात सर्वदूर मोसमी पावसाची हजेरी बघायला मिळणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मित्रांनो खरं पाहता अजूनही देशातील अनेक भागात मान्सून दाखल झालेला नाही. यामुळे खरीप हंगामात अजूनही अपेक्षित अशी पेरणीची कामे झालेली नाहीत. हाती आलेल्या आकडेवारीनुसार या खरीप हंगामात आत्तापर्यंत पेरणी मध्ये घट दिसून आली आहे.

यामुळे देशातील अनेक भागात शेतकरी बांधव अगदी चातकाप्रमाणे मान्सूनची वाट पाहत आहेत. दरम्यान राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात पेरणीयोग्य पावसाची नोंद झालेली नाही. मात्र पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असल्याने लवकरच राज्यात सर्वत्र पेरणीची कामे उरकतील असा अंदाज बांधला जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या वर्षी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. मान्सून केरळमध्ये 29 मे ला दाखल झाला. त्यानंतर मान्सून राज्यात दहा जूनला आल्याचे हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले. दहा जूनला तळ कोकणात दाखल झालेला मान्सून अवघ्या चोवीस तासात मुंबई मध्ये पोहोचला.

त्यानंतर मान्सून काही काळ गायब झाला होता मात्र 19 जून पर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला. खरं पाहता  15 जून पर्यंत मान्सून संपूर्ण राज्यात दाखल होतो, परंतु या वर्षी मान्सून साठी पोषक वातावरण तयार झाले नसल्याने मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्रात चार दिवस उशिरा दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.

या जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट 

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देखील दिला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

याशिवाय मध्य महाराष्ट्रमधील सातारा, कोल्हापूर, विदर्भ यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्याना जोरदार पावसाचा इशारा दिला गेला असून भारतीय हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाने विदर्भ मधील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना विजांसह पावसाचा इशारा दिला असून येलो अलर्ट देखील जारी केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe