अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव : सीएए आणि एआरसी या विधेयकाला जनसमर्थन मिळवून देण्यासाठी भाजपाच्या आजी, माजी आमदारांनी जनजागृती करणे गरजेचे असल्याचे पत्रक नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, भारताच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या या दोन्ही विधेयकाला केवळ मोदी द्वेषाने पछाडलेले विरोधक किळसवाणा विरोध करीत असताना भाजपाच्या गावपातळीपासून तर सर्वोच्च नेत्यांपर्यंत सर्वांनीच मैदानात उतरून समाज प्रबोधन करण्यासाठी तयार झाले पाहिजे.
देशाची धर्मशाळा होत असताना शांत बसता कामा नये. ज्याप्रमाणे निवडणूक जिंकण्यासाठी नेते दारोदार पायपीट करतात त्याप्रमाणे आता सुद्धा घरोघरी जाऊन या विधेयकाचे महत्व सांगून त्याबद्दलचे गैरसमज, गैरप्रचार किती चुकीचे व राजकीय हेतूने प्रेरित आहेत हे नागरिकांना पटवून दिले पाहिजे.
केवळ मतांच्या गठ्ठ्यासाठी कुणी जर केंद्र सरकारच्या देशहितासाठी महत्वाच्या असलेल्या विधेयकाच्या समर्थनासाठी पुढे यायचे टाळणार असतील तर त्याची गंभीर दखल पक्षाने घेतली पाहिजे.