अहमदनगर जिल्ह्यातून तब्बल 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- जिल्ह्यात 332 अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. याबाबत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाकडे गुन्हे दाखल झाले असून 254 मुलींची सुटका करण्यात आली आहे. मात्र गुन्हे वाढत असल्याने पालकांनीही लक्ष देण्याची गरज अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वसामन्य कुटुंब असो किंवा उच्चशिक्षीत कुटुंबीय त्यांच्या मुलांच्या अट्टाहासापायी त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यास कुठेही कमी पडतांना दिसत नाही. मुलांना क्‍लासेसला जाण्यासाठी दुचाकी तसेच मोबाईल दिला जात आहे. मात्र, मुले मोबाईल, फेसबुक, व्हॉटस ऍप अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमप्रकरणाच्या भूलथापांना बळी पडत आहे.]

अल्पवयीन मुलींबरोबर 73 अल्पवयीन मुलांचे अपहरणाची नोंद झाली असून, त्यातील 67 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्याच बरोबर 6 पुरुषांचे व 9 महिलांचे अपहरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. 2018 ते 19 मध्ये शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपहरणाच्या घटना घडल्या आहेत.

यामध्ये सर्वाधीक घटना एमआयडीसी पोलीस ठाणे, संगमनेर, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. सोशल मीडियावरील भुलथापांना बळी पडलेल्या अल्पवयीन मुली ह्या 14 ते 17 वयोगटामधील सर्वाधिक प्रमाण असल्याचे आढळून आले आहे.

याघटनाबाबत जिल्ह्यातील संबधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो. व या घटनेचा तपास चार महिन्यांच्या आत लागला नाही तर तो गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग केला जातो. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्या हद्दीत घडलेल्या घटनेचा आकडा वाढतच चालला असून 332 वर पोहचला आहे.

बळजबरीने अपहरण झाल्याच्या घटना कमी आहेत. मात्र, सातवी ते बारावी मधील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे. विद्यार्थ्यांचा मोबाईलचा वाढता वापर, मुलांचे आकर्षण अशा प्रकारामुळे मुली प्रेमाच्या जाळ्यात फसतात. व स्वत: हुन पळून गेल्याच्या घटना जास्त असल्याचे निदर्शनास आल्या आहेत.

Web Title – About 332 minor girls abducted from Ahmednagar district!

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment