माजीमंत्री पाचपुतेंकडून सुजय विखेंसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणावळीचे नियोजन !

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विजया साठी शुक्रवारी (२९ मार्च) कार्यकर्ता मेळावा व जेवणावळीचा कार्यक्रम काष्टीमध्ये आयोजित केला आहे.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार करण्याऐवजी भाजपच्या गोटात दिसत आहेत.

डॉ. विखे हे लोकसभेची ३ वर्षांपासून तयारी करत असल्यामुळे त्यांचा श्रीगोंद्यामध्ये मोठा जनसंपर्क तयार झाला आहे.

श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघातील आढळगाव, काष्टी, कोळगाव, येळपणे, मांडवगण, बेलवंडी, चिचोंडी पाटील व वाळकी या आठ जि. प. गटांमध्ये विखेंनी जनसेवा फाउंडेशनतर्फे आरोग्य शिबिरे घेतली.

डॉ. सुजय यांचे आजोबा बाळासाहेब विखे यांनी श्रीगोंदे पंचायत समितीचे सभापती म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे विखे कुटुंबाचे तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आहेत. हे कार्यकर्ते भाजपचा प्रचार करत आहेत.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी पाचपुते यांनी काष्टी येथे कार्यकर्ता मेळाव्याबरोबर कार्यकर्त्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवणावळीचे जंगी नियोजन केले आहे. मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांना तसा निरोपही देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment