‘इंस्ट्राग्राम’वर मुलाशी मैत्री करणे महागात : फ्रुटीमधून मद्य पाजून कारमध्ये 14 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- एका 14 वर्षीय मुलीला ‘इंस्ट्राग्राम’वर एका मुलाशी मैत्री करणे महागात पडले आहे, दोन नराधम तरुणांनी तिला फ्रुटीमधून मद्य पाजून कारमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर नराधमांनी पीडितेला अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले.

हे पण वाचा :- तरुणीसोबत प्रेमाचे नाटक, आणि नंतर गुप्तांगात घातली बिअरची बाटली

याबबत सविस्तर माहिती अशी कि, जाटल रोडवरील एक कॉलनीत राहणारी पीडित मुलगी 11 वीचा विद्यार्थिनी असून तिची 15 दिवसांपूर्वी ‘इंस्ट्राग्राम’वर तिची आरोपी आशीषशी मैत्री झाली होती. काही दिवस दोघे चॅटिंग करत होते. नंतर दोघांनी एकमेकांन आपापले मोबाइल नंबर शेअर केले. 

हे पण वाचा :- विराज राजेंद्र विखे याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल !  

ओळख झाल्यांनतर पीडितेला मॉडल टाऊन येथील डीएव्ही पार्कजवळ भेटायला बोलावले होते. दोघांनी तिला पार्कबाहेर स्कूटी लावायला सांगितली. नंतर तिला कारमध्ये बसवले. दोघांनी तिला फ्रूटीमधून मद्य पाजले. मुलीने शुद्ध हरपली. नंतर नराधमांनी एका कालव्याजवळ कार थांबवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

हे पण वाचा :- विधवा मुलीची छेड काढणाऱ्याचा बापाने केला बंदोबस्त,केली भररस्त्यात त्या तरुणाची हत्या !

नंतर तिला जवळपास तीन तास कारमध्ये फिरवले. एक कालव्याजवळ कार थांबवून दोन्ही नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. नंतर पीडितेला डीएव्ही पार्कजवळ अर्धनग्न अवस्थेत फेकून दिले. आरोपी पळून जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांना पकडले.पीडितेवर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- बायकोने दरवाजा उघडायला केला उशीर, DSP ला आला राग केला पत्नीवर गोळीबार …

शुक्रवारी (24 जानेवारी) सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडली. रात्री उशीरा पीडित मुलगी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवली. या प्रकरणी आशीष सेखू चौहान (वय-19, रा. सतकरतार कॉलनी) वीशू संदीप (वय-20,) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment