Business Idea: शेतीतुन मिळणार लाखों रुपये…! ‘या’ औषधी पिकाची शेती करा, 20 लाखांची हमखास कमाई होणारं

Ajay Patil
Published:

Business Idea: आपल्या देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) पिकं पद्धतीत मोठा बदल करत आहेत. आता देशात नगदी (Cash Crop) तसेच औषधी (Medicinal Plant Farming) आणि मसालापिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे. राज्यातील शेतकरी बांधव देखील काळाच्या ओघात आता नगदी पिकांची शेती (Farming) करत आहेत.

बडीशोप (Fennel crop) हेदेखील एक प्रमुख मसाला वर्गीय नगदी पीक आहे. त्याची शेती शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आज आपण बडीशोप या पिकाच्या शेती विषयी जाणून घेणार आहोत. बडीशेप शेती (Fennel Farming) करून शेतकरी चांगला नफा कमवू शकतात.

या शेतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वालुकामय जमीन वगळता कोणत्याही प्रकारच्या जमिनीवर याची लागवड करता येते. ज्या जमिनीच्या मातीचे पीएच मूल्य 6.6 आणि 8.0 अशी जमीन त्याच्या लागवडीसाठी सर्वात योग्य असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या चांगल्या उत्पादनासाठी 20 ते 30 अंश तापमान असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

जिरे, धणे, मेथी, बडीशेप, इत्यादी पिकांची लागवड भारतात मोठ्या प्रमाणात केली जाते. या मसाल्यांची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते खरीप किंवा रब्बी या दोन्ही हंगामात वाढवू शकता. मात्र खरीप हंगामात या पिकांची पेरणी करताना पाण्याचा निचरा होणारी शेतजमीन निवडणे अत्यंत गरजेचे असते.

बडिशोप पिकाच्या शेतीसाठी आवश्‍यक पूर्वमशागत

बडीशेप पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी शेताची चांगली तयारी करावी. सर्वप्रथम शेतकऱ्यांनी शेताची एक किंवा दोन नांगरणी करावी. पाटा लावून माती भुसभुशीत केल्यानंतर शेत सपाट करून सोयीनुसार बेड तयार करा. सर्व प्रथम, बडीशेप रोपवाटिकेत बियांच्या माध्यमातून तयार करा आणि नंतर शेतात लावा.

यावेळी काढणी करा

बडीशेप तेव्हाच काढावी जेव्हा बडीशेप लोंब्या पूर्णपणे विकसित होतात आणि बिया पूर्णपणे पिकतात. काढणीनंतर एक ते दोन दिवस बडीशेप पिकं शेतात कोरडे करावे. यानंतर, ते 8 ते 10 दिवस सावलीच्या ठिकाणी वाळवावे. यामुळे बडीशेपचा हिरवा रंग टिकून राहत असतो.

मिळतो इतका नफा

एका एकरात बडीशेप लागवड केल्यास दोन लाखांपर्यंतचा नफा सहज मिळू शकतो. या दरम्यान जास्तीत जास्त 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. तुम्ही जितके अधिक क्षेत्रात याची शेती कराल तितका नफा वाढेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10 एकरात बडीशेप घेतली तर हा नफा वार्षिक 20 लाख रुपयांपर्यंत पोहोचेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe