अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथून एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात आरोपीने पळवून नेल्याचा गुन्हा श्रीरामपूर तालुका पोलिसांत दाखल करण्यात आला होता.
पो नि खान यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस कसून तपास करीत होते. मात्र मुलगी सापडत नव्हती.आज सकाळी गाँडगाव परिसरातील दिगंबर रायभान तांबे यांच्या शेतातील विहिरीत पालथ्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळून आला.
घटनेची खबर मिळताच पोनि खान फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दुपारी उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सदर मयत तरुणीचे नाव रुपाली नवनाथ तांबे , वय १७ वर्ष असे असून तिने आत्महत्या का केली ? घसरुन पडली का ? या विहिरीकडे ती कशाला गेली ? तिचा मोबाईल कुठे आहे ?
अशा अनेक प्रश्नांचा तपास पोनि खान यांच्या मार्गदर्शनाखाली सो गायकवाड हे करीत आहेत. रुपाली तांबे या अल्पवयीन तरुणीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने परिसरात हळहळ व शोक व्यक्त होत आहे.