अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी तिनशे रुपयांवर विना अनुदानितवर काम केलेला शिक्षक आहे. त्यामुळे मला विना अनुदानित प्राध्यापकांसह शिक्षकांचे दुःख चांगले माहित आहे यांची कल्पना मला आहे. पगार कमी असल्यावर काय होते, आणि पगार नसल्यावर काय होते.हे मला माहित आहे. पगार नसल्यावर कोणी बायको देत नाही, दिली तर ती स्विकारण्यास तयार होत नाही. त्यामुळे सत्यजित तांबे यांना विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न आपल्या मामांना सांगा असे आवाहन निवृत्ती इंदोरीकर महाराज यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रुक येथे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा वाढदिवस सोहळा पार पडला. यावेळी , ना.प्राजक्त तनपुरे, खा.सदाशिव लोखडे, आ.आशुतोष काळे, आ.रोहित पवार, आ.राधाकृष्ण विखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे आदि उपस्थित होते.
इंदुरीकर महाराज पुढे म्हणाले की, विना अनुदानित शिक्षक आणि प्राध्यापका काम करत असताना पाहुणे मार्केट देत नाही ,पैसे नसले तर मित्र परिवार जमत नाही, विशेष काम गेल्यावर कमविण्याचा मोसम संपवून जातो. ५८ वर्षी रिटायर होणारे ४० टक्के शिक्षक ४५ च्या पुढे सापडतील.
त्यांना फुल पेमेंट मिळाले तरी दहा वर्षात कशी गाडी घेणार , कधी बंगला बांधणार , कधी कोणाचे व्याही होणार अशी खंत त्यांनी व्यक्त करत त्यांनी सर्व विना अनुदानित शाळेचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा अभ्यास करावा असे आवाहन त्यांनी केले.
विना अनुदानित शिक्षकांच्या व्यथा मांडत त्यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांना तुम्ही विना अनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि पगार मिळण्यासाठी आपल्या मामांबरोबर बोला असे सुचित केले. यावेळी आ.रोहित पवार, विखे पाटील, तांबे आदिंची भाषणे झाली.