हेलिकॉप्टरमधून फिरणाऱ्या डॉ.सुजय विखेंकडे स्वतःची गाडी नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- हेलिकॉप्टरमधून फिरणारे उमेदवार म्हणून ओळख असणारे सुजय विखे यांच्याकडे प्रत्यक्षात स्वतःच्या मालकीचे एकही वाहन नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

सोमवारी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून या वेळी त्यांनी २८ पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.

डॉ. सुजय विखे हे कोट्यधीश असले तरी त्यांच्याकडे स्वतःच्या नावावर एकही गाडी नाही. उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

डॉ. विखे, त्यांच्या पत्नी धनश्री विखे व मुलगी अनिशा विखे या तिघांच्या नावावर मिळून एकूण जंगम मालमत्ता ९ कोटी ४ लाख ८४ हजार ५५७ रुपये आणि स्थावर मालमत्ता ७ कोटी ८१ लाख ८० हजार १६ रुपये आहे.

धनश्री विखे यांनी प्रवरा सहकारी बँकेच्या लोणी शाखेतून २६ लाख २३ हजार ९६४ रुपयांचे कर्ज घेतले असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/04/01/politics-sujay-vikhe-property-112/
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment