अहमदनगर लाईव्ह 24 टीम/ नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करताना केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दहशतवादी म्हटले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, की दिल्लीचे मुख्यमंत्री एक दहशतवादी आहेत.
ते लोकांना निरागस चेहरा करून विचारतात, मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात ते दहशतवादीच आहेत असे जावडेकर म्हणाले आहेत. जावडेकरांच्या या विधानावर आम आदमी पक्षाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.
#WATCH Union Minister Prakash Javadekar in Delhi: Kejriwal is making an innocent face & asking if he is a terrorist, you are a terrorist, there is plenty of proof for it. You yourself had said you are an anarchist, there is not much difference between an anarchist & a terrorist. pic.twitter.com/vRjkvFKGEO
— ANI (@ANI) February 3, 2020
केंद्रीय मंत्री जावडेकर सोमवारी बोलताना म्हणाले, “केजरीवाल अतिशय निरागस चेहरा घेऊन लोकांमध्ये जातात आणि विचारतात, की मी दहशतवादी आहे का? प्रत्यक्षात केजरीवाल दहशतवादीच आहेत. त्यांनी स्वतः म्हटले होते की ते अराजकतावादी आहेत. अराजकतावादी आणि दहशतवादी यात जास्त काहीच फरक नाही. दोघेही सारखेच असतात.”
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com