Success Story : शेतकऱ्याच्या पोराचा नादच खुळा ! नोकरीं गेली तरी पट्ठ्या खचला नाही, ‘हा’ शेतीपूरक व्यवसाय सुरु केला, अन गेल्या वर्षी 14 लाखांचा धनी झाला

Ajay Patil
Published:
success story

Success Story : मित्रांनो भारतात कोरोनाच्या काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, केरळच्या कुन्नूर जिल्ह्यात राहणारे आयटी प्रोफेशनल ब्रिगीथा कृष्णा देखील अशा लोकांपैकी एक होते, पण नोकरी (Job) गेल्यानंतर तो हातावर हात ठेवून बसू शकला नाही.

तो त्याच्या उलीकल (कुन्नूर जिल्ह्यात स्थित) गावात परतला आणि पारंपारिक काजू लागवडीत (Cashew Farming) कुटुंबात सामील झाला. कुन्नूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू (Cashew Crop) पिकतात, परंतु पावसाळ्यात काजू मोठ्या प्रमाणावर भिजतात कारण त्यांना खरेदीदार मिळत नाहीत. ही परिस्थिती पाहून कृष्णाला अंकुरलेल्या काजूच्या व्यवसायाची (Sprouted cashew business) एक नवीन कल्पना सुचली आणि ही कल्पना काही वेळातच गाजली देखील.

नोकरी गेल्यानंतर त्यांनी आपल्या गावात काजूची लागवड (Cashew Cultivation) करण्यास सुरुवात केली. पावसाळ्यात मोठया प्रमाणात पीक भिजल्याने त्यांना खरेदीदार मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांचे 3 क्विंटल काजू पीक पावसात असेच भिजले.

एके दिवशी त्याने काही ओले काजू काळजीपूर्वक पाहिले आणि काजूला अंकुर फुटल्याचे आढळले, तेव्हाच त्याच्या मनात एक नवीन व्यवसायाची कल्पना (Business Idea) आली आणि त्याने अंकुरलेल्या काजूंचा व्यवसाय (Agriculture Business) सुरू केला. ओल्या काजूला बाजारात अजिबात मागणी नाही, पण जर ते अंकुर फुटल्यानंतर विकले गेले तर आरोग्यदायी स्नॅक म्हणून त्याला अधिक व्यावसायिक मूल्य मिळते.

काजू अंकुरीत करण्यासाठी केलं हे काम 

ब्रिजिथ कृष्णाने आपल्या कौशल्याचा आणि पत्नी श्रीशमाच्या कॉम्प्युटर अँप्लिकेशनच्या ज्ञानाचा सुयोग्य उपयोग करून अशी मूलभूत रचना तयार केली जिथे काजूंना उगवण करण्यासाठी योग्य वातावरण मिळते. त्यासाठी त्यांनी स्वस्त ह्युमिडिफायर, व्हॅक्यूम ड्रायर, सटरलाइजेशन उपकरणे वापरली. त्यांनी तयार केलेल्या खास ट्रेमध्ये काजू 16 दिवस ठेवल्यानंतर त्यांची चव चांगली येते.

नवीन तंत्रज्ञानाची मदत

आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांना नवीन तंत्रज्ञानाची गरज भासू लागली आणि त्यासाठी त्यांनी केरळ कृषी विद्यापीठातील कृषी उपक्रम आणि काजू संशोधन केंद्र, मडक्कथारा यांच्याशी संपर्क साधला, तेथून त्यांना या संदर्भात नवीन माहिती आणि तंत्रे  मिळाले. याद्वारे त्यांना त्यांच्या अंकुरलेल्या काजूचे उत्पादन वाढविण्यात यश आले.

अंकुरलेले काजू आहेत पोषक तत्वांनी परिपूर्ण

अंकुरलेल्या काजूंवर केलेल्या प्रयोगशाळेतील चाचण्यांमधून असे दिसून आले की ते भरपूर प्रमाणात पोषक आहेत. त्यात लोह, कॅल्शियम आणि अमीनो ऍसिडचे प्रमाण जास्त होते, याशिवाय उगवण प्रक्रियेदरम्यान चरबीचे प्रमाण निम्म्यावर येते, म्हणजेच ते अधिक निरोगी होते. अंकुरलेले काजू भाज्या, फळांचे सॅलड, सूप, ब्रेड स्प्रेड, मिल्कशेक इत्यादींमध्ये वापरले जातात. ब्रिजिथ आणि त्यांच्या पत्नीने त्यातून विविध प्रकारचे पदार्थ बनवून ते मित्र आणि नातेवाईकांमध्ये वाटण्यास सुरुवात केली आणि लोकांना ते खूप आवडले. त्यानंतर त्यांनी संभाव्य ग्राहकांना रिटेल स्टोअरकडे आकर्षित केले.

स्वतःचा ब्रँड तयार केला

नोव्हेंबर 2020 मध्ये ‘Eatery malabarikas’ नावाचा उपक्रम स्थापन केला आणि ‘Kajusprouty’ हा ब्रँड तयार केला. खरं पाहता केरळ राज्यात पूर्वीपासून पावसात अंकुरलेले काजू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. परंतु राज्यात प्रथमच अंकुरलेले काजू ब्रिगिथने व्यावसायिक स्तरावर तयार केले असून याचा व्यवसाय देखील यशस्वी चालवला आहे.

ब्रिजिथ त्याचा व्यवसाय वाढवतचं आहे. ते लोणचे, अंकुरलेले सूप मिक्स, अंकुरलेल्या काजूपासून बिस्किट यासारखी मूल्यवर्धन उत्पादने देखील तयार करत आहेत. याशिवाय, नवीन उगवण तंत्रज्ञानाचा अवलंब करून ते केवळ काजूचे शेल्फ लाइफ वाढवू शकले आहेत असे नाही तर आता ते वर्षभर काजू अंकुरू शकत आहेत. पूर्वीचे काजू फक्त 90 दिवस उगवले जात होते. तो पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीने काजू उगवत आहे.

ऑनलाइन आणि ऑफलाइन विक्री

कृष्णा आपले उत्पादन थेट रिटेल आउटलेटवर तसेच ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे विकत आहे. तो ई-कॉमर्सला किफायतशीर आणि सोयीस्कर मानतो. ते त्यांची उत्पादने दुबई आणि शारजहान सारख्या देशांमध्ये निर्यात करतात. 2020-21 मध्ये त्यांची उलाढाल 14 लाख रुपये होती. कृष्णाची इच्छा आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करून जागतिक ब्रँड बनण्याची आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe