अहमदनगर :- नगर लोकसभेची जागा भाजप व राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच विखेंना येथून उमेदवारी दिली असल्याने त्यांचे विशेष लक्ष या मतदारसंघावर आहे.
दुसरीकडे पवार यांनी डॉ. विखेंना उमेदवारी नाकारताना आमदार संग्राम जगताप यांना उतरवून त्यांच्यासाठी आपलीही जिल्ह्यातील राजकीय ताकद एकवटली आहे.

त्यामुळे येत्या १५-२० दिवसात या मतदारसंघात दोन्ही बाजूंनी स्टार प्रचारकांच्या सभांचा धडाका दिसणार आहे.
मार्चच्या अखेरीस नगरमध्ये समर्थकांची बैठक घेऊन पवारांनी जगतापांना दिलासा दिला असताना आता सर्वात आधी त्यांच्याच दोन प्रचार सभा जिल्ह्यात घेतल्या जाणार आहेत.
येत्या शुक्रवारी (५ एप्रिल) सायंकाळी शेवगावला व शनिवारी (६ एप्रिल) कर्जतला त्यांच्या सभा होणार आहेत.
दरम्यान सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्याचे भाजपचे नियोजन एकीकडे सुरू असताना दुसरीकडे त्यांची ही सभा झाल्यानंतर लगेच मनसेचे प्रमुख राज ठाकरे संग्राम जगताप यांच्यासाठी सभा घेण्याची शक्यता आहे.
बदलत्या राजकारणात ठाकरे व पवार यांच्यात मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
त्यामुळेच त्याचे पुढचे पाऊल म्हणून मोदींविरोधात त्यांच्याच भाषेत आगपाखड करण्यासाठी राज ठाकरेंना पुढे केले जाणार असल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर नगरला मोदींची सभा झाल्यावर लगेच राज ठाकरेंचीही सभा अपेक्षित मानली जात आहे.
मोदींची १३ एप्रिलला रामनवमीच्या दिवशी वा नंतर १५ ते १८ एप्रिलदरम्यान सभा घेण्याचे नियोजन आहे. त्यामुळे त्यानंतर राज ठाकरेही नगरला येण्याची शक्यता आहे.
- अवघ्या 30 सेकंदात संपूर्ण शहर होऊ शकतं राख, ‘या’ देशाकडे आहे जगातील सर्वात विध्वंसक अणुबॉम्ब!
- फक्त पैशासाठी भगवंताचं नाव घेतलं तर…; प्रेमानंदजी महाराजांचे शब्द तुमचं आयुष्य बदलू शकतात!
- पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाव्यात, कोणत्या टाळाव्यात? निरोगी आरोग्यासाठी वाचा या टिप्स!
- घरात ‘ही’ वनस्पती चुकूनही लावू नका, वास्तुशास्त्र सांगतं या वनस्पतीमुळे नशिबावर होतो परिणाम!
- चंदनच नाही तर भारतातील 99% लोकांच्या घरापुढील ‘ही’ 2 झाडे सापांना देतात आयत निमंत्रण !