भारतात सर्वसाधारणपणे आढळणाऱ्या सहा कर्करोगांबाबतची आकडेवारीही अहवालात नमूद करण्यात आली आहे. यामध्ये स्तन कर्करोग (१,६२,५०० रुग्ण), तोंडाचा कर्करोग (१,२०,००० रुग्ण), गर्भाशयाचा कर्करोग (९७,००० रुग्ण), फुप्फुसाचा कर्करोग (६८,००० रुग्ण), पोटाचा कर्करोग (५७,००० रुग्ण) आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा (५७,००० रुग्ण) समावेश आहे.
नव्याने आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी या सहा प्रकारच्या कर्करोगींचा आकडा ४९ टक्क्यांच्या घरात आहे.कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाही, तर येत्या २० वर्षांत जागतिक कर्करोगाचे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढू शकते, असा इशारा डब्ल्यूएचओने दिला आहे. तर गरीब देशांमध्ये हा आकडा ८१ टक्क्यांच्या घरात जाण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशात कर्करोगींची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याबद्दलही अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील प्रत्येक १० पैकी एका व्यक्तीला कर्करोग जडण्याचा धोकाही डब्ल्यूएचओने अहवालातून व्यक्त केला आहे. अशा कॅन्सरग्रस्त रुग्णांमधील प्रत्येक १५ पैकी एकाला मृत्यूचा धोका असल्याचेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
अहवालानुसार, भारतात २०१८ या एकाच वर्षात कर्करोगाचे तब्बल ११ लाख ६० हजार नवीन रुग्ण आढळून आले. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. पुरुषांमध्ये कर्करोगाचे ५ लाख ७० हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर महिलांमध्ये हा आकडा ५ लाख ८७ हजार इतका होता. यादरम्यान देशात ७ लाख ८४ हजार ८०० जण कर्करोगाने दगावले.
जवळपास २२ लाख ६० हजार जण गेल्या पाच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत असल्याबद्दलही अहवालाने चिंता व्यक्त केली आहे.भारतात तंबाखूजन्य पदार्थाशी संबंधित कर्करोगींची संख्या अधिक आहे. पुरुषांमध्ये याचे प्रमाण ३४ ते ६९ टक्क्यांदरम्यान आहे. तर १० ते २७ टक्के महिलांना तंबाखूमुळे कर्करोग जडल्याचे समोर आले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, जगात तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्यांची संख्या १६.४ कोटी तर सिगारेट फुंकणाऱ्यांची संख्या ६.९ कोटी इतकी आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये भारत, चीन व इंडोनेशियातील नागरिकांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.संयुक्त राष्ट्रे : कर्करोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून, जगात २०४० पर्यंत हे प्रमाण ६० टक्क्यांनी वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटना अर्थातच डब्ल्यूएचओने अहवालातून व्यक्त केली आहे.
भारतातील प्रत्येक १० पैकी एका व्यक्तीला कर्क रोगाचा धोका असल्याचा इशाराही अहवालातून देण्यात आला आहे. जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने मंगळवारी जारी केलेल्या अहवालानुसार, भारतात तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग जडलेल्यांचे तसेच स्तनाचा कर्करोग असलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com