बाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले !

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा पुन्हा कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत.

धनादेश न वटल्याच्या पुण्यातील एका व्यक्तीने दिलेला तक्रारीनंतर सासवड व श्रीगोंदे पोलिसांनी मंगळवारी नाहाटा यांना लोणी व्यंकनाथ येथे ताब्यात घेतले.

नाहाटा यांना सासवड न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले असल्याने त्यांना सासवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.

बाजार समितीच्या माध्यमातून सभापती, त्यानंतर नगरपालिकेत सहभागासाठी संघर्ष यामुळे नाहाटा चर्चेत आहेत.

तालुक्यातील दिगज्ज राजकारण्यांना विरोध, त्यातून राज्यपातळीवरील पद, आदिवासी प्रकरणानंतर टीडीआरचा विषय चर्चेत आला.

श्रीगोंदे पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील एकूण पाच गुन्ह्यांत न्यायालयाने नाहाटा यांना वॉरंट बजावले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार नाहाटा यांच्याविरोधात, गिरमकर विरुध्द नाहाटा, वृद्धेश्वर विरुध्द नाहाटा या गुन्ह्यांत जामीनपात्र वॉरंट असून,

पितळे विरुध्द नाहाटा या व्यतिरिक्त दोन प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment