कोरोना विषाणूबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन माहिती दिली आहे. सध्या 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 9452 व्यक्ती सामुदायिक निगराणीखाली आहेत.
नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. सर्वच राज्ये कोणत्याही आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी आपली जलद पथके वारंवार बळकट करत आहेत. एकूण 1 हजार 510 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून यापैकी 1507 नमुने नकारात्मक आहेत.
तर केरळमध्ये यापूर्वीच तीन जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 21 विमानतळांवर 1818 उड्डाणे आणि 1लाख 97हजार 192 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे.