कर्जत :- भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना अच्छे दिन’चे गाजर दाखवून देशाची व राज्याची सत्ता काबीज केली.
पण सामान्य माणूस, शेतकरी, व्यावसायिक मेटाकुटीला आला आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातत मूलभूत सुविधांची समस्या आहे.

सीतपूर गावात तीन महिन्यांपासून अंधार आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचा टँकर पोहोचत नाही.
हे अच्छे दिन नसून आतापर्यंतचे सबसे बुरे दिन’ आहेत, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली.
पाण्याचा टँकर नियमित येत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. जगताप म्हणाले, खोटारड्या लोकांनी शेतकऱ्यांसह सामान्य जनतेचा भ्रमनिरास केला.
नुसत्याच योजनांच्या घोषणा केल्या, पण अंमलबजावणी केली नाही. पाच वर्षांत नोटबंदी, आरक्षण, कर्जाच्या समस्यांमुळे सर्वांना खूप त्रास झाला.
- 15 जानेवारीला शेअर मार्केट बंद राहणार का ? स्टॉक एक्सचेंजने दिली मोठी माहिती
- 2026 पुणेकरांसाठी ठरणार खास ! मार्च महिन्यात सुरू होणार आणखी एक मेट्रो मार्ग
- महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी ! इथं उभारला जातोय नवीन रेल्वेमार्ग
- पत्नीसमवेत पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक करा ! दरमहा मिळणार 9,250 रुपयांचे व्याज
- एसबीआयने सुरु केली हर घर लखपती योजना ! २० रुपयाच्या गुंतवणुकीतून मिळणार एक लाख रुपये













