संगमनेर :- तालुक्यातील कोकणगाव परिसरातील निझर्णेश्वर मंदिराच्या परिसरातील जंगलात महिलेचा संशयास्पद मृतदेह मंगळवारी आढळून आला.
आरोपींनी दुसऱ्या एका तरुणालादेखील लस्सीतून विषारी औषध पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

दरम्यान पोलिसांनी बारकाईने तपास करत अवघ्या बारा तासांच्या आत खरा गुन्हेगार शोधून काढला.
मंदाबाई लहानू जोंधळे (वय ४५, कोकणगाव) ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार सोमवारी रात्री पोलिसांत दाखल करण्यात आली होती.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तिचा मृतदेह निझर्णेश्वर मंदिराजवळील जंगलात आढळला.
त्याचवेळी लस्सीतून विष देऊन संजय चांगदेव पावसे (३७) याला मारण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. पावसेवर संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
पोलिसांनी त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे चार वाजता त्याच्याकडे आलेल्या तिघांनी त्याला रस्त्यावर बोलावून घेत अपहरण केले.
त्यांच्याच सांगण्यावर त्याने मंदाबाई जोंधळे हिला मोबाइलवर फोन करून गाडी बंद पडल्याचे सांगत दावे घेऊन बोलावले.
गाडीतील लोकांनी तिलादेखील गाडीत बसवून लोणी-कोल्हार रस्त्याने पुढे नेले. प्रवासादरम्यान मंदाबाईच्या चेहऱ्यावर प्लास्टिकची पिशवी आवळून तिचा खून केला.
मलादेखील लस्सीतून विषारी औषध देण्यात आले. निझर्णेश्वर येथील जंगलात तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना आपण तेथून सटकलाे आणि झालेला प्रकार ग्रामस्थांना सांगितला, असे पावसे याने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी ग्रामस्थ, पावसेच्या माहितीची खातरजमा केली. जंगलाचा परिसर पिंजून काढत पुरावे गोळा केले. संशयाची सुई पावसेकडे वळली.
उपचार घेत असलेल्या पावसेकडे पुन्हा विचारणा केली असता आधीच्या व नंतरच्या माहितीत पोलिसांना त्रुटी आढळल्या. त्यामुळे पावसे हाच खुनी असल्याचे समोर येऊ लागले.
पावसेे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मंदाबाई त्याचे लग्न होऊ देत नव्हती. प्रेमप्रकरणातून हा खून केल्याचा संशय आहे, असे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.
- महाराष्ट्रातील ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला रेकॉर्डतोड भाव !
- वाईट काळ संपला ! आता हवं ते मिळणार, 16 जानेवारी 2026 पासून ‘या’ 3 राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश
- महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली मोठी गुड न्यूज ! महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सरकारने घेतला मोठा निर्णय
- ……तर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 5 टक्के महागाई भत्ता वाढ! आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी मिळणार मोठी गुड न्यूज
- अदानी पॉवर आणि टाटा मोटर्ससह ‘या’ 5 शेअर्स मधून कमाईची मोठी संधी ! गुंतवणूकदारांचे पैसे होणार डबल













