नेवासे :- गावातील महिलेबरोबर असलेल्या आपल्या अनैतिक संबंधाचा व्हिडीओ पाहिल्याचा राग आल्याने पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना नेवासे तालुक्यातील मोरेचिंचोरे येथे रविवारी घडली.
स्वाती शंकर दुर्गे (२२) असे या विवाहितेचे नाव असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती शंकर पाराजी दुर्गे, सासू चंद्रकला दुर्गे व कांचन संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटना घडल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. गंभीर भाजलेल्या स्वातीच्या जबाबावरून सोनई पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. स्वातीने जबाबात म्हटले आहे की, पती शंकर याचे गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध होते.
त्याचा व्हिडीओ त्याने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ पाहिल्याचा राग आल्याने शंकरने पेट्रोल टाकून पेटवून दिले. सासू चंद्रकला व कांचन गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचेही स्वातीने जबाबात म्हटले आहे.