Soybean Market Price : सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा! सोयाबीन साडे पाच हजारावर, वाचा आजचे बाजारभाव

Soyabean Price Hike

Soybean Market Price : सोयाबीन दरात (Soybean Rate) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकचं आहे गड्या महिनाभरापूर्वी सोयाबीन (Soybean Crop) सहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री होत होता. मात्र गत महिन्याभरापासून सोयाबीनचा दरात (Soybean Bajarbhav) घसरण होत आहे.

गेल्या आठवड्यात सोयाबीन (Soybean) तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या किमान दरावर विक्री होत होता. राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत (Apmc) सोयाबीन लाख चार हजार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळत होता. मात्र आता सोयाबीनच्या दरात मामुली बढत बघायला मिळत आहे.

मित्रांनो खरं पाहता आज रविवार असल्याने राज्यातील जवळपास सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव हा बंद होता. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad) सिल्लोड आणि औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनचे लिलाव बघायला मिळाले. महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर या दोन कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सोयाबीन लिलावाची माहिती देण्यात आली आहे.

या दोन कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनच्या दराचा थोडीशी वाढ बघायला मिळाले आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार 421 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरी देखील सोयाबीनच्या बाजारभावात थोडीशी वाढ झाली असल्याने आगामी काळात सोयाबीनचे बाजार भाव अजूनच वाढतील अशी आशा शेतकर्‍यांना आहे.

मित्रांनो बाजारात अजूनही नवीन सोयाबीनची आवक बघायला मिळत नाहीये. तरी देखील बाजारात सोयाबीनच्या दरात अजूनही अपेक्षित अशी वाढ बघायला मिळालेली नाही. यामुळे जेव्हा बाजारात नवीन सोयाबीन दाखल होईल तेव्हा सोयाबीनच्या बाजारभावात घसरण होते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये बघायला मिळत आहे.

मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती घेऊन येत असतो. अशा परिस्थितीत आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोन क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सिल्लोड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात सिल्लोड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 100 एवढाच सर्वसाधारण बाजार भाव देखील मिळाला आहे.

औसा कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो औसा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 271 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 421 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 288 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe