सर्वसामान्य जनतेच्या लोकनेत्या: आ. मोनिकाताई राजळे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेवगाव -पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी गेल्या पाच वषांर्त मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांमुळे ज़नतेने त्यांना पुन्हा भरघोस मतांनी निवडून देऊन पाच वर्षे ज़नतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. दोन्ही तालुक्यांतील जनतेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास आमदार राजळे यांनी विकासकामांतून सार्थ ठरवला आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्य ज़नतेच्या लोकनेत्या व कार्यसम्राट आमदार म्हटले ज़ाते.

आ. राजळे यांनी मागील पाच वर्षांत मतदारसंघातील अनेक गावांतील विविध विकास कामे मार्गी लावली आहेत. आ. राजळे या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही असतात.

गावागावांत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न, रस्ते डांबरीकरण, मजबुतीकरण, सभामंडप, पुनर्वसित गावांचे प्रश्न, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई, आदी प्रश्न सोडविण्यास त्यांनी प्राधान्य दिले आहे. आ. राजळे यांना दोन्ही तालुक्यांतील तरुण कार्यकर्तै, ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य मिळत असून, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील जनता तसेच प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची चांगली साथ मिळत आहे.

आमदार राजळे या नेहमी दोन्ही तालुक्यांतील जनतेच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. यामध्ये लग्न समारंभ असो की, सामाजिक कार्यक्रम, या कार्यक्रमांना त्या आवर्ज़ून हज़ेरी लावतात. दोन वर्षांपूर्वी पाथर्डीचे माजी आमदार राजीव राजळे (पती) यांच्या निधनामुळे त्यांच्या संपूर्ण कुंटुबाला मोठा धक्का बसला होता.

परंतू जिल्ह्यासह तालुक्यातील ज़नतेने व कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देऊन आपण पुन्हा राजकारणात नव्या जोमाने सक्रिय व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच माज़ी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आ. राज़ळे यांच्या कासार पिंपळगाव येथील सिद्धसावली, निवासस्थानी भेट देऊन पुन्हा राजकारणात येण्याचे आवाहन केले. त्यानंतर आ. राज़ळे या राज़कारणात सक्रिय झाल्या.

आ. राज़ळे यांचा स्वभाव अतिशय शांत व मन मिळावू असून, त्यांनी आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांवर कधीही वैयक्तिक पातळीवर टीका केलेली नाही. त्यामुळे इतर राज़कीय पक्षांतील नेत्यांना त्यांच्याविषयी सहानभूती आहे. त्यांना कृष्णा व कबीर,ही दोन मुले असून, कृष्णा हा उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया देशात आहे.

आ. राजळे यांना दोन्ही तालुक्यांतील तरुण व ज्येष्ठ कार्येकत्यांर्ची साथ मिळत आहे. त्यांना तालुक्यातील राजकारणात पती स्व. माज़ी आमदार राजीव राजळे, माजी आमदार अप्पासाहेब राजळे (सासरे) यांचा राजकीय वारसा मिळालेला आहे.

त्यामुळे त्यांना तालुक्याच्या प्रथम महिला आमदार होण्याचा बहुमानही मिळाला आहे. आ. राज़ळे या मतदारसंघातील ज़नतेच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत असतात. त्यामुळे मतदारसंघातील ज़नता त्यांचा कार्यसम्राट आमदार म्हणून उल्लेख करतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment